सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.संचालक ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच महुडे खोऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बुजुर्ग कार्यकर्ते पर्वतनाना कुमकर रा. महुडे वय -७५ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.माजी सैनिक संतोष पर्वती कुमकर यांचे ते वडील होत.
पर्वतनाना कुमकर यांनी अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून राजकारण बाजूला ठेवून समाजकारण केले असल्याने समाजात त्यांचा मोठा नावलौकिक आहे. पर्वतनाना यांच्या निधनाने महुडे खोऱ्यात तसेच तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आह