विद्यार्थीनीच्या वडिलांच्या उपचारासाठी सोमेश्वर विद्यालयाचा शिक्षक धावला ...! फलटणचे आमदार चव्हाण यांचा आमदार फंड पावला..!

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोमेश्वरनगर या शाळेतील प्राची सतीश संकपाळ या विद्यार्थिनीचे वडील सतीश संकपाळ  मुरूम (बोंद्रे वस्ती) ता. फलटण गेली चार वर्ष मोटार निरोन डिसीज( मसल डॅमेज) या आजाराने पीडित आहेत.   या आजाराच्या औषध उपचारासाठी आजपर्यंत या कुटुंबाने पंधरा लाख रुपये खर्च केला आहे. त्यामुळे या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची व बिकट झाली आहे.
या कुटुंबाची माहिती मिळताच या कुटुंबाला भेटून दिली. आणि या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी फलटण तालुक्याचे आमदार दीपकजी चव्हाण यांच्याशी सोमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा
 हनुमंत माने यांनी फोनवरून संपर्क साधून संपूर्ण पार्श्वभूमी सांगितली. प्रा. माने हे अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते. घरची परिस्थिती ऐकून आमदार चव्हाण यांनी कुटुंबाची आज भेट घेऊन परिस्थिती समजावून घेतली.  
          आमदार चव्हाण आपल्या स्वतःच्या आमदार फंडातून या आजारासाठी औषध उपचार व मंत्रालयातून आरोग्य विभागाच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच चॅरिटी कमिशनर यांच्याशी फोनवर संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. 
यावेळी महादेव संकपाळ (माजी उपसभापती- पंचायत समिती फलटण)  रमेश बोंद्रे (संचालक-श्रीराम सहकारी साखर कारखाना साखरवाडी) प्रा. हनुमंत माने, सूर्याजी संकपाळ, मधुकर संकपाळ, सुधाकर संकपाळ, वसंत संकपाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
 या कुटुंबाला समाजातील दानशूर मंडळींनी आर्थिक मदत करावी. असे आवाहन करण्यात येत आहे. 
 आशा सतीश संकपाळ 
बँक ऑफ महाराष्ट्र (शाखा- साखरवाडी) Ac/No -60422505697
IFSC code-MAHB0000324
To Top