पुणे येथील डॉ. शौनक अन्नछत्रे यांना राज्यस्तरीय आरोग्य सेवा पुरस्कार प्रदान

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जेजुरी : प्रतिनिधी
पुणे येथील प्रसिद्ध डाॅ. शौनक अन्नछत्रे(MD) यांना कै.दिनकरराव सावंत प्रतिष्ठान (जेजुरी) यांच्यातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय आरोग्य सेवा पुरस्कार देण्यात आला.
   डॉक्टर अन्नछत्रे यांनी आरोग्य शिबीरे मोफत तपासणी असे विविध आरोग्य सेवा रुग्णांना दिल्या आहेत, यामुळे वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रतिष्ठान ने याची दखल घेऊन कै. दिनकरराव सावंत राज्यस्तरीय आरोग्य सेवा पुरस्कार नुकताच प्रतिष्ठान चे अध्यक्ष व पत्रकार संजय सावंत यांनी प्रदान  केले. पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले. या मध्ये महेश पेशवे (पत्रकार), नगरसेवक अजिंक्य देशमुख, राजाभाऊ पेशवे, नगरसेवक सचिन सोनावणे यांनी डॉक्टर अन्नछत्रे यांचे अभिनंदन केले. 
To Top