बारामती ! आळंदीकर सराफ दालनास भारतीय मानक ब्युरोच्या केंद्रीय पथकांची भेट : दागीन्यांच्या ऑनलाईन नोंदीबाबत केले समाधान व्यक्त

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम---  
सोमेश्वरनगर ( प्रतिनिधी )
देशभरात सोने चांदी शुद्ध मिळावे म्हणून केंद्रसरकारने हॉलमार्क कायदा आणला .मोठ्या प्रमाणात जागृती ही केली .त्यानंतर आता राज्यात ठिकठिकाणी या भारतीय मानक ब्युरो चे अधिकारी हॉलमार्क केलेल्या दागीन्यांची तपासणी करीत आहेत . आज ए.जी. आळंदीकर सराफ व पुनम ज्वेलर्स आळंदीकर सराफ या दोनही दुकानात भारतीय मानक ब्युरो च्या अधिकारी वर्गानी अचानक भेट दिली ए जी आळंदीकर सराफ दुकानात हॉलमार्क कायद्याबाबत वर्तमानपत्रातील ॲड गणेश आळंदीकर यानी लिहिलेले लेखाची कात्रणे पाहुन त्यानी ग्रामीण भागातील जनजागृतीबद्दल ए.जी. आळंदीकर सराफ या पेढीचे कौतुक केले .त्यानी दागीने भारतीय मानक ब्युरो च्या प्रणाली वर नोंदणीकृत असल्याची ही खात्री केली .लोणंद येथील के एम .आळंदीकर सराफ पेढीला पण त्यानी अचानक भेट देवुन बारामती सराफ असोसिएशन चे अध्यक्ष व ईंडीया बुलीयन ज्वेलर्स असोसिएशन चे राज्य समन्वयक किरण आळंदीकर यानी जनजागृतीसाठी राज्यात ठिकठिकाणी सेमिनार आयोजीत केल्याबद्दल त्यांचे ही कौतुक केले . 
       ए.जी.आळंदीकर सराफ च्या प्रो.प्रा.अमरजा आळंदीकर व पुनम ज्वेलर्स च्या संगीता आळंदीकर  यानी प्रत्येक दागीन्याबद्दल या अधिकारी वर्गाला माहीती  व नमुने दिले .ग्राहकाना शुद्ध सोने मिळावे यासाठी आळंदीकर सराफांच्या सर्व पेढ्यामधे हॉलमार्क सक्तीचा कायदा येण्या अगोदर पासुन हॉलमार्क दागीने विक्री केले जातात हे समजल्यावर त्यानी विशेष समाधान व्यक्त केले .
               ऱाज्यात सर्वच सराफानी आता बदलत्या कायद्यानुसारचे हॉलमार्क करुन दागीने विक्री करावेत असे आवाहन भारतीय मानक ब्युरो च्या अधिकारी वर्गाने व्यक्त  केले
To Top