सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
प्रधानमंत्री टी बी मुक्त भारत अभियानांतर्गत राजभवन मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अभियानात महत्वाची भूमिका बजावून उल्लेखनीय काम केल्याबद्दल टिटेघर ता.भोर येथील ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते राजीव केळकर यांना निक्षय मित्र पुरस्काराने राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
राज्यभरातून १०० निक्षय मित्रांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी अतिरिक्त सचिव डॉ प्रदीपजी व्यास, प्रधान सचिव संतोष कुमार, राज्यपाल मुख्य सचिव डॉ. रामास्वामी प्रमुख उपस्थित होते.भोर तालुका आरोग्य विभागाकडून राजीव केळकर यांची निक्षय मित्र म्हणून निवड करण्यात आली होती.यासाठी भोरच्या गटविकास अधिकारी स्नेहा देव,तालुका आरोग्य अधिकारी सुर्यकांत कराळे यांचे सहकारी लाभले. निक्षय मित्र पुरस्काराने राजीव केळकर सन्मानित झाल्याने तालुक्यातून त्यांच्या अभिनंदन होत आहे.