वाई-पाचगणी रस्त्यावर भरधाव चालणाऱ्या डंपर चालकांवर कारवाई करा : आरपीआयची तहसीलद व पोलीस प्रशासनाकडे मागणी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
वाई--पाचगणी रस्त्यावर वाळूची वाहतूक करणारे डंपर भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात घडवीत असून यामध्ये अनेकांचा जीव नाहकपणे जात आहे, याला सर्वच विभागाचे प्रशासक अधिकारी जबाबदार आहेत, महसूल विभाग, बांधकाम विभाग, तसेच पोलीस प्रशासन यांना गांभीर्याने घेत नसल्याने वाई व पाचगणी परिसरामध्ये डंपर (वाळू व खडी वाहतूक करणारे वाहन) या मुळे अनेक अपघात झाले आहेत. तरी त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशा आशयाचे लेखी निवेदन वाई तालुका आरपीआयच्या वतीने तहसीलदार रणजीत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे –खराडे, बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, पोलीस निरीक्षक बाळसाहेब भरणे यांना देण्यात आले आहे. 
             निवेदनात असेही म्हटले आहे, वारंवार होणाऱ्या या अपघातांच्या मालिकांमुळे वाईकरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रोड रोमिओ, दुचाकी वरून ट्रिपल सीट, नो पार्किंग मधील वाहन, लायसेन्स नसणारे वाहन धारक, यांच्यावर अनेकवेळा कारवाई होताना निदर्शनास येत आहे, मात्र डंपर चालकांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे अश्या वाहन धारकांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी वाई व पाचगणी परिसरातील नागरिक करीत आहेत, पाचगणीहून वाईकडे येत असताना डंपरचालक अतिशय वेगाने येत असतात, किसनवीर महाविद्यालय परिसरामध्ये हजारो विद्यार्थी त्या रस्त्यावरून येजा करतात, त्यामुळे त्याठिकाणी पोलिस चेकपोस्ट तयार करण्यात यावे, ज्यामुळे अवैध वाळू वाहतूक व वेगमर्यदा या दोन्ही गोष्टीवर अंकुश ठेवण्यात आपल्या विभागाला यश येऊ शकते.
बांधकाम विभागाकडे वाई विभागातील नागरि
To Top