खंडाळा ! लोणंदचा आठवडे बाजार गुरुवार पासून शेळ्या-मेंढ्यासाठी होणार सुरू

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद, : प्रतिनिधी
लोणंद कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणारा जनावरे बाजार राज्यात वाढत असलेल्या लम्पी रोगाच्या पार्श्‍वभूमीवर अनिश्चित काळासाठी नुकताच १५ सप्टेंबर पासून स्थगित करण्यात आला होता. मात्र आता सुधारीत आदेशानुसार सदरचा बाजार शेळ्या-मेंढ्यासाठी पुन्हा खुला करण्यात येणार आहे.
पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शेळी मेंढीचा बाजार भरविण्यास बंदी करण्यात आलेली नसल्याचे कळवल्याने खंडाळा तहसीलदार व तालुका पशुधन विकास अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर लोणंद बाजार आवारातील फक्त शेळी-मेंढी बाजार गुरुवार दि.२२ पासून सुरू करण्यात येणार आहे.
येणार्‍या गुरुवार दिनांक २२ पासून बाजार आवारातील फक्त शेळी-मेंढी बाजार सुरू करण्यात येणार असून गौजातीय गुरे, म्हैशी विक्रीस आणू नये याची नोंद सर्व शेतकरी व खरेदीदार व्यापाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन बाजार समितीचे वतीने सचिव विठ्ठल सपकाळ यांच्याकडून करण्यात आली आहे.
To Top