वाई ! दौलतराव पिसाळ ! 'मांढरदेव'च्या 'कालिदास'ने सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला : बक्षिसांची सर्व रक्कम दिली फाउंडेशनला

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी  
मांढरदेव ता वाई येथील कालिदास हिरवे ने सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला : बक्षिसांची सर्व ४५ हजार रुपये रक्कम मांढरदेवी ऍथलेटिक्स फाउंडेशन ला मदत म्हणून दिले. 
          कालिदास ने खुल्या गटात द्वितीय तर 30 ते 34 या वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला काल सातारा येथे सातारा हिल मॅरेथॉनचे अकरा वे पर्व संपन्न झाले रिमझिम बरसणारा पाऊस, वाहणारा वारा, उंच उंच डोंगर, नागमोडी वळणे आणि हिरवीगार वनराई याच्यातून कास पठाराच्या दिशेने जाणाऱ्या आणि धावण्यासाठी अतिशय अवघड समजल्या जाणाऱ्या मॅरेथॉनमध्ये काल सात हजार धावकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत मांढरदेवी येथील कालिदास हिरवे याने खुल्या गटात द्वितीय क्रमांक मिळवला व आपल्या वयोगटात प्रथम क्रमांक मिळवला अशा दोन बक्षिसांची त्यांनी कमाई केली.         
          कालिदास हिरवे हा मूळ मांढरदेव येथील गडगेवाडी या छोट्याशा गावातील आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे त्याने यापूर्वीही अनेक राज्य राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक जिंकलेली आहेत. 2017 साली झालेल्या आशियाई मैदानी स्पर्धेत त्याने 10000 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले होते त्याला महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देखील प्राप्त आहे. तो सध्या पुणे येथील एलआयसी मध्ये उच्च पदावर कार्यरत आहे .   कालिदास सध्या फुल मॅरेथॉन (42की.मी.)ची तयारी करत आहे आगामी एशियन गेम्स व पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी फुल मॅरेथॉन ची त्याची तयारी चालू असून प्रशिक्षक राजगुरू कोचळे व धोंडीराम वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करतो. काल खरंतर कालिदास हिरवे मांढरदेवी अथलेटिक्स फाउंडेशन या संस्थेसाठी पळत होता कालची मिळणारी सर्व रक्कम त्याने आपल्या या फाउंडेशन ला मदत म्हणून देऊ केली आहे असे त्यांनी पुरस्कार घेता वेळी घोषित देखील केले.                   
          मांढरदेव ॲथलेटिक्स फाउंडेशन हे मांढरदेव येथे मांढरदेव,वाई, सातारा व महाराष्ट्रातील गरीब मुलांसाठी ॲथलेटिक्स प्रशिक्षण कार्यक्रम राबवते या मुलांना प्रशिक्षण,राहण्याची सोय, विविध सराव शिबिरे आणि इतर सर्व सोयी मोफत करून दिली जाते आणि या खेळाडूंना राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवते.कालिदास देखील या फाउंडेशन मध्ये सराव करून अतिशय उच्च पदावर पोहोचलेला आहे. कालिदाच्या नंतरही अनेक खेळाडू मांढरदेव येथे घडत आहेत आपल्या मागे तयार होणाऱ्या या खेळाडूंना मदत व्हावी म्हणून काल तो धावला आणि जिंकलेली सर्व रक्कम म्हणजे 45 हजार रुपये त्याने मांढरदेव अथलेटिक्स फाउंडेशनला डोनेट केले आहेत. कालिदास च्या या यशाबद्दल व दातृत्व वृत्ती बद्दल सर्वच स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.
To Top