सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील भोलावडे, किवत ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदाची पंचवार्षिक निवडणूक रविवार दि.१८ पार पडली .अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत प्रथमच थेट जनतेतून सरपंच होण्याचा मान भोलावडेतील युवा पदवीधर प्रविण जगदाळे व किवतमधील जुन्या विचारांचे तानाजी चंदनशिव यांना मिळाला .
भोलावडेत २ हजार २७६ एकूण मतदानापैकी २ हजार सात मतदारांनी आपला मतदान हक्क बजावला .किवत मध्ये ७३६ पैकी एकुण ६८१ मतदारांनी मतदान केले. सोमवार दि.१९ झालेल्या मतमोजणीत सरपंचपदासाठी भोलावडेतील दुरंगी लढतीत प्रविण बाळासाहेब जगदाळे तर किवत येथील चौरंगी लढतीत तानाजी चंदनशिव यांनी बाजी मारली.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सुनिल धर्माकांबळे यांनी काम पाहिले तर पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक व मतमोजणी निकाल पक्रिया शांततेत पार पडली.