हडपसर ! पालखीमार्गावर शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात : एक ठार तर पाचजण जखमी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
हडपसर : प्रतिनिधी
पालखी महामार्गावर हडपसर सासवड दरम्यान असलेल्या उरूळी देवाची फाट्याजवळ शिवशाही बस आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला तर अन्य पाचजण जखमी असल्याचे समजत आहे.
          पंढरपूर येथून पुण्याच्या दिशेने चाललेली शिवशाही बस पालखी मार्गावरील उरूळी देवाची फाट्याजवळ आली असता अचानक गोडाऊन मधून बाहेर आलेल्या कंटेनरवर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसच्या समोरील भागाचा चक्काचुर झाला . या अपघातात एक ठार तर पाच प्रवासी जखमी झाले आहेत.  जखमींना उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. या अपघातामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूस लांबलचक रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहीती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल होवून मदतकार्य सुरू करण्यात आला व अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
To Top