पुरंदर ! भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का : वीर-भिवडी गटाचे अध्यक्ष महेश राऊत यांचा राष्ट्रवादीला रामराम

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : वार्ताहर  
सासवड येथे विधान परिषद सदस्य व आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वीर-भिवडी गटाचे अध्यक्ष महेश राऊत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची मोठी पडझड झाल्याचे मानले जात आहे.
          पुरंदर तालुक्यात डझनभर पुढारी असून देखील एकमेकांचे पाय ओढण्याच्या शर्यतीमुळे तालुक्यात पक्षाची मोठी नाचक्की झाली आहे. अंतर्गत गटबाजीमुळे गतवेळच्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला खातेही उघडता आले नाही तसेच पक्षात निष्ठावंतांना पदमुक्तीची भेट तर घराणेशाही व जवळचे नातेवाईकांना पदे मिळत आहेयाचाच परिणाम पुढे येऊ घातलेल्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकावर होणार हे नक्की. तालुक्यातील राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते व मी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला असल्याचे महेश राऊत यांनी सांगितले.
        हा प्रवेश भाजपचे तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे प्रवेश प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जलिंदर कामठे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, प्रदेश अध्यक्ष किसन मोर्चा वासुदेव नाना काळे, पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष गिरीष जगताप, निलेश जगताप, श्रीकांत थिटे, कैलास जगताप, सासवड शहराध्यक्ष साकेत जगताप, जालिंदर जगताप , आनंदभैय्या जगताप, अमोल जगताप आदी उपस्थित होते.
    यावेळी महेश राऊत यांच्याबरोबर माजी सरपंच जयसिंग म्हेत्रे, विकास सोसायटीचे संचालक विलास अंबुले, नारायण जगताप, बाळकृष्ण जगताप, कानिफनाथ जगताप, संजय जगताप उपस्थित होते.
To Top