सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ
नाशिक येथे चालू असलेल्या वरिष्ठ राज्य मैदानी स्पर्धेमध्ये मांढरदेव येथील मांढरदेवी अथलेटिक्स फाउंडेशनच्या खेळाडूंनी उत्तम अशी कामगिरी केली. नाशिक येथे दिनांक 21 व 22 रोजी झालेल्या वरिष्ठ गट मैदानी स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत मांढरदेव ऍथलेटिक्स फाउंडेशनच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवत यश संपादन केले या स्पर्धेत बाळू पूकळे याने 5000 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला तर महिला गटात आकांक्षा शेलार हिने 5000 मीटर मध्ये प्रथम तर विशाखा साळुंखे हिने तृतीय क्रमांक मिळवला Heptathlon या क्रीडा प्रकारात संपदा ढमाळ हिने द्वितीय क्रमांक मिळवला संदीप जोयशी यांने 1500 मी. धावणे या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला.3000 मी. स्टीफलचेस या क्रीडा प्रकारात हर्षवर्धन दबडे याने द्वितीय क्रमांक मिळवला.सर्व खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक राजगुरू कोचळे व धोंडीराम वाडकर यांचे मार्गदर्शन लाभले. मांढरदेवी अथलेटिक्स फाउंडेशनच्या सर्व खेळाडूंचे पावसाळी शिबिर SVJCT स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स डेरवण तालुका चिपळूण या ठिकाणी चालू आहे. सिंथेटिक ट्रॅक वर सराव केलेला चा फायदा देखील या खेळाडूंना झाला असे मत प्रशिक्षक राजगुरू कोचळे यांनी व्यक्त केले. सर्व यशस्वी खेळाडूंचे मांढरदेवी ग्रामस्थ, सातारा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.