सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
ओझर्डे येथील महिला समूहांच्या निवेदना मुळे
आगार प्रमुख गणेश कोळी यांनी दुसऱ्याच दिवशी दोन जादा एसटी बसेस सुरु केल्याने त्यांचे पालक आणी विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत .
वाईचे आगार प्रमुख गणेश कोळी वाहतुक निरिक्षक किरण धुमाळ वाहतुक नियंत्रक कय्युम शेख या कर्तव्य दक्ष अधिकारी वर्गांने ओझर्डे जोशीविहीर खानापुर येथील विद्यार्थ्यान साठी ने आन करण्या साठी असणार्या एसटी बसेस कमी पडत असल्याने बसेस वाढवून मिळाव्यात या साठी ओझर्डे ता.वाई येथील ८ महिला समूहांच्या पदाधिकार्यानी एकत्रीत येऊन जादा एसटी बसेसची मागणी निवेदना व्दारे केली होती. वरील तिनही जबाबदार अधिकार्यांनी आलेल्या निवेदनाची तातडीने दखल घेऊन दुसर्याच दिवशी सकाळी ६|४५ आणी ७|३० वाजता अशा दोन जादा बसेस सुरु करुन विद्यार्थी आणी पालकांची होत असलेली गैरसोय दुर करुन वाई आगार तालुक्यातील जनतेला एसटी बसेस पुरविण्या साठी सक्षम आहे हे दाखवून दिल्याने या अधिकारी वर्गाचे ओझर्डे जोशी विहीर कदमवाडी आणी खानापुर गावातील विद्यार्थी आणी पालकांनी आभार मानले आहेत .
सविस्तर वृत्त असे कि ओझर्डे जोशीविहीर कदमवाडी आणी खानापुर या गावांन मध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे हे सर्व विद्यार्थी वाई या तालुक्याच्या ठिकाणी प्राथमिक माध्यमिक आणी महाविद्यालयात शिक्षणा साठी सकाळी ६|३० पासून जातात या साठी वाई आगाराची वाठार वाई एसटी ओझर्डे गावात सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास येते पण ती एसटी येतानाच फुल भरून येते त्या मुळे जोशीविहीर खानापुर कदमवाडी आणी ओझर्डे गावातील विद्यार्थ्यांना बस मध्ये चढण्या साठी जागा मिळत नसल्याने त्यांना शाळेत जाता येत नाही त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते हे ओझर्डे ता.वाई येथील रुचीरा बांदल छाया फरांदे दिपाली पवार पल्लवी पिसाळ शुभांगी खरात सुनीता शेलार अनिता क्षीरसागर भाग्यश्री पिसाळ आशा फरांदे सुजाता पिसाळ कल्याणी घोरपडे कवीता फरांदे या महिला समूहांच्या पदाधिकारी व सदस्यांच्या ही गंभीर बाब लक्षात आल्यावर त्यांनी थेट निवेदन तयार करुन वाई आगार प्रमुखांच्या दालनात जाऊन निवेदन देऊन एसटीच्या जादा फेर्यांची मागणी केली होती .
दिलेल्या निवेदनाची आगार प्रमुख गणेश कोळी वाहतुक निरिक्षक किरण धुमाळ वाहतुक नियंत्रण कय्युम शेख यांनी तात्काळ दखल घेऊन दुसर्याच दिवशी दोन जादा बसेस सुरु करुन ओझर्डे महिला समुहाला न्याय दिल्याने या अधिकारी वर्गाचे ओझर्डे ग्रामस्थांनी आणी विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे .