सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
वाईच्या पश्चिम भागातील दसवडी गावातील रहिवासी असलेले प्रकाश दुर्गाळे यांचा वाईतील एका इमारतीचे रंगकाम करत असताना ते शिडीवरुन अचानक खाली जमीनीवर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने दसवडी गावावर शोककळा पसरली आहे .
या अपघाताची नोंद वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे .वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वाई शरद मारुती वाघ वय २८ राहणार चिखली हे इमारतीचे रंग कामांचे कामे घेत असतात त्यांच्याकडे प्रकाश नारायण दुर्गावळे वय ५० राहणार दसवडी आणी अमृत अंकुश गुरव राहणार कुसगाव असे वरील तिघेही वाई तालुक्यातील रहिवासी आहेत. दि.१८ सप्टेंबर रोजी वरील तिघेही धोम कॉलनी येथील सतीस जाधव यांच्या घराचे रंग कामासाठी गेले होते दुपारी आडीच नंतर बंगल्याच्या बाहेरील भिंतीला रंग देण्या साठी भिंतीला लावलेली शिडी होती त्या वर रंगाचा डबा घेऊन प्रकाश दुर्गावळे हे वर चढले आणी शिडी हालु नये म्हणून शरद वाघ आणी अमृत गुरव हे शिडी धरुन ऊभे होते .प्रकाश दुर्गावळे हे भिंतीला रंग देत असताना त्यांनी एक पाय शिडीवर तर दुसरा पाय खिडकीच्या लॅप्टवर ठेवून रंगाचे काम सुरु केले होते त्या वेळी दुर्दैवाने प्रकाश दुर्गावळे यांचा लॅप्टवर ठेवलेला पाय अचानक पणे निसटला आणी त्यांचा तोल गेल्याने ते क्षणार्धात खाली असलेल्या फरशी वर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने डोक्यातुन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तरीही शरद वाघ आणी अमृत गुरव या दोघांनी त्यांना तातडीने औषधे ऊपचारा साठी वाईतील खाजगी रुग्णालयात नेहले पण तेथील ऊपस्थित डॉक्टरांनी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात नेहण्या साठी सांगितले तेथे नेहले
असता तेथील ऊपस्थित डॉक्टरांनी दुर्गावळे यांची तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले . या घटनेची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना समजताच त्यांनी तातडीने हवलदार जी.एन.घोटकर यांना ग्रामीण रुग्णालयात पाठवले ते तेथे पोहचून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा करून तो शवविच्छेदना साठी पाठवला .शवविच्छेदन झाल्या नंतर मृतदेह अंतविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला .त्यांच्या वर शोकाकुल वातावरणात दसवडी येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.