भोर ! पुणे जिल्हा बँकेचा १०५ वा वर्धापनदिन केक कापत केला साजरा : खातेदारांचा चहापान देऊन मान-सन्मान

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
दुर्गम -डोंगरी भोर तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादितच्या ११ शाखांमध्ये १०५ वा वर्धापनदिन खातेदारांच्या उपस्थितीत केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
    बँकांना रविवारची आठवडे सुट्टी असतानाही व्यवहार बंद ठेवून ७० कर्मचाऱ्यांनी आपापल्या शाखांमध्ये हजर राहून बँकांच्या जवळील खातेदारांना निमंत्रित करून केक कापून वर्धापन दिन साजरा केला.यावेळी खातेदारांना चहा -पान तसेच नास्था देवून सन्मान करण्यात आला.बँकेला आठवड्याची सुट्टी असली तरी शेतकऱ्यांच्या ५० हजार रुपयांच्या अनुदानासाठी बँक सुरू ठेवण्यात आली होती असे विभागीय अधिकारी सुदाम पवार यांनी सांगितले. यावेळी कृष्णा शिंनगारे, एकनाथ शिवतरे, भाऊ लेकावळे, नगरसेवक जगदीश किरवे , निसार नालबंद ,बँक व्यवस्थापक बाळासाहेब चव्हाण,सचिन जेधे,विनोद काकडे, तुषार नांदे, सत्यवान आवळे, राजेंद्र हुंबरे, लक्ष्मण गिरे ,शाम घोणे, अमित किंद्रे,धनंजय भिलारे,आप्पा खोपडे,बाळू मोरे आदींसह खातेदार बहुसंख्येने उपस्थित होते.

To Top