सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : प्रतिनिधी
सध्या स्थापन झालेले भाजपा-शिंदे गटाचे दळभद्री सरकार हे फार दिवस टिकणार नाही.एकूणच लोकप्रियतेवर ते ४५ हून अधिक खासदार निवडून आणण्याचे स्वप्न पहात आहेत पण ते धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही,असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
येणारी चोवीसशे वर्ष जन्म घेतला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा बाल्लेकिल्ला असणाऱ्या बारामती, पुणे, पिंपरी-चिंचवड या परिसरात काहीही फरक पडणार नाही. एकंदरीत भाजप चे असे धोरण असते की, ज्या ठिकाणी आपल्या बाबतीत वातावरण खराब आहे अशा ठिकाणी जायचं. त्यामुळे चर्चा होण्याइतपत त्यांचं बारामतीला येणं आहे. या अगोदरच्या अनेक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बारामतीत डिपॉझिट गमावला आहे. प्रत्येक निवडणुकीची परिस्थिती वेगळी असते. लक्ष काय ठेवावे हे त्यांचा अधिकार आहे. पण जनतेने आपल्या मनात कोणाला लक्ष केलंय हे मात्र निश्चित झालेलं आहे. त्यामुळे हे दळभद्री सरकार फार दिवस टिकणार नसल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
COMMENTS