सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
गणेश उत्सव विसर्जन दिवशी मिरवणुक शांततेत पार पडावे तसेच आगामी सन नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी सणांच्या पार्श्वभुमिवर वडगाव निंबाळकर सुपा पोलिसांनी सुपा गावातुन सशस्त्र संचलन केले.
वडगाव निंबाळकर सुपा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सोमनाथ लांडे व सुपा पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक सलिम शेख ,पोलीस उपनिरिक्षक योगेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस व सुपा पोलीसांनी सुपा बस स्टॉप येथुन पथ संचलन केले.
सुपा बस स्थानक , छत्रपती शिवाजी महाराज चौक ,बाजारतळ चौकातुन पोलिस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी एकत्र आले.यानंतर पोलीसांचे पेट्रोलिन गाडी समोर सायरन देत बाजार तळ, जय भवानी चौक , ग्रामपंचायत कार्यालय, मारूती मंदीर रोड, दरेकर चौक ,जिल्हा परिषद शाळा नं १ , माळआळी या ठिकाणी रुट मार्च काढत जनतेला शांततेचा संदेश देत, शक्ती प्रदर्शन केले.
सुपा हे अष्टविनायक महामार्गावरील गाव असल्यामुळे मोठी लोकवस्ती व बारावाडी वस्तीचा परिसर आहे.तसेच याठिकाणी दोन महाविद्यालयही आहेत , सुप्यात जवळजवळ दहा ते बारा हजार नागरिक रहातात. यात विविध जाती, धर्माचे नागरिक, कामगार राहात असून जातीय सलोखा रहावा, आगामी सण उत्सव काळात शांतता रहावी तसेच गणेश उत्सव मिरवणुक शांततेत निघावी, म्हणून पोलिस स्टेशनच्यावतीने रुट मार्च काढत नागरिकांना शांतता राखण्याचा संदेश दिला.यावेळी सुपे पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार भाऊसाहेब शेंडगे, अमंलदार दत्तात्रय जाधव ,पोलीस नाईक दत्तात्रय धुमाळ किसन ताडगे ,रूपेश सांळूके, सचिन दरेकर सह महिला पोलीस आदी अधिकारी उपस्थित होते ,
अचानकपणे मोठ्या संख्येने पोलिस फौज फाटा गावात आल्याने नागरिकही घबराहट कुतुहालाने पहात होते.
----------------
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत गणपती ऊस्तव अनुषंगाने गणेश विसर्जन दिवशी मिरवणूक शांततेत पार पडावी, या करिता वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील कोऱ्हाळे बु!!, वडगाव निंबाळकर, करंजेपुल, सुपा, काऱ्हाटी यां गावामध्ये आज रोजी रूट मार्च घेण्यात आला रूट मार्च करिता 03 अधिकारी, 35 पोलीस अंमलदार, 30 होमगार्ड असे हजर होते.