सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : प्रतिनिधी
निमगाव केतकी गावाजवळ सोनमाथा परिसरातील रानात वीज कोसळून एक म्हैस दगावल्याची घटना आज (दि.८) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडली.
सुनील तळेकर यांच्या शेतात ही घटना घडली.सोनमाथा परिसरात सोनाई कॅटल या पशुखाद्य निर्मिती प्रकल्पाजवळ तळेकर यांचे शेत आहे.पाऊस चालू असताना वीज पडून आपल्या गोठ्यातील एक म्हैस दगावल्याचे त्यांनी सांगितले.