सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुका दुर्गम डोंगरी असल्याने जनता ही गरीब आहे.मागील दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील गोर- गरीब जनतेसाठी आरोग्य शिबीर आयोजित केले होते.त्या शिबिरात साडेतीन हजारांच्यावर विविध आजारांच्या रुग्णांनी सहभाग नोंदवला होता.त्यातील बहुतांशी लोकांना विविध आजारांवर मोफत लाभ मिळाला आहे.पुढील काळात लवकरच जनतेच्या सेवेसाठी पुन्हा मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करणार करु असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे युवा मंच भोर आयोजित भव्य गौरी सजावट स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी आमदार थोपटे यांनी केले. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम राजगड ज्ञानपीठच्या मानद सचिवा स्वरूपा संग्राम थोपटे यांचे प्रमुख उपस्थितीत भोरेश्वर मंगल कार्यालय भोर येथे संपन्न झाला.गौरी सजावट स्पर्धेमध्ये ७५० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.भोर शहरातील प्रत्येक प्रभागातील २ स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. स्पर्धेचे उत्तम नियोजन केल्याबद्दल आयोजकांचे व अत्यंत उत्साहपूर्वक सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे आमदार थोपटे यांनी अभिनंदन केले.प्रथम क्रमांकाचे बक्षीस रेफ्रिजरेटर स्वरुपा संग्राम थोपटे यांचेतर्फे विजेत्या पल्लवी सुशांत मोहीते,द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पिठाची चक्की सचिन हर्णसकर गटनेते भोर न.प. यांचेतर्फे विजेत्या रूपाली संजय तांबे,तृतीय क्रमांकाचे बक्षीस मायक्रोओव्हन आमदार थोपटे युवा मंच भोर यांचेतर्फे विजेत्या संगीता भाग्येश तारू,चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस वाटर प्युरिफायर उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर यांच्याकडून विजेत्या विद्या नितीन बोडके तर
पाचव्या क्रमांकाचे बक्षीस फूड प्रोसेसर बजरंग शिंदे यांचेतर्फे विजेत्या नयन विशाल म्हेत्रे यांनी पटकावले.
यावेळी नगरसेवक सुमंत शेटे,समीर सागळे,अमित सागळे, गणेश पवार,देविदास गायकवाड,अनिल पवार,नगरसेविका पद्मिनी तारू,आशा रोमन,तृप्ती किरवे,रूपाली कांबळे,अमृता बहिरट,वृषाली घोरपडे, सोनम मोहिते,आशा शिंदे, स्नेहा पवार, मा.नगराध्यक्ष तानाजी तारू,महीला तालुकाध्यक्षा गीतांजली शेटे, शहर महिलाध्यक्षा सुरेखा भेलके यांचेसह भोर शहरातील महिलावर्ग व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते