सोमेश्वर रिपोर्टर टीम---
.वडगाव निंबाळकर : सुनील जाधव
महाराष्ट्रातील मातीतील उमाजी नाईक हे देशातील पहिले वीर ठरले. यांनी इंग्रज सत्तेचा मनात दहशत निर्माण करण्याचे काम केले. कोणत्याही महिलेवरती जर अत्याचार झाले. तर उमाजी नाईक हे भावासारखे धावून जात होते. असे मत बहुजन हक्क परिषदेचे बारामती तालुक्याचे युवक अध्यक्ष अमोल गायकवाड यांनी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त वडगाव निंबाळकर येथील प्राथमिक मुलांची शाळा नंबर १ या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करताना केले.
वडगाव निंबाळकर येथे जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा नंबर १ या ठिकाणी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक रमेश भंडलकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल जाधव व राजे उमाजी नाईक तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनील खोमणे होते. यावेळी आकाश आगम, यशराज आडागळे, सोहम चव्हाण, ओमकार हाक्के, आर्यन यादव आयन बागवान, या विद्यार्थ्यांनी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या बद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षक रमेश भंडलकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उमाजी नाईकांचे विचार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोचले पाहिजे. उमाजी नाईकांची जयंती ही इतर महापुरुषांप्रमाणे शासकीय जयंती म्हणून साजरी करण्यात यावी यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांनी प्रयत्न केल्याचे आपल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी नाभिक महामंडळाचे बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष जीवन राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल जाधव, अनिल खोमणे,संतोष आगम अशोक खोमणे व आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक मित्र मंडळ वडगाव निंबाळकर यांचे सर्व सदस्य उपस्थित होते.तसेच यावेळी इतर खर्च टाळून वडगाव निंबाळकर परिसरातील शाळेत उमाजी नाईक या महापुरुषांचा फोटो भेट देण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अरुणा अगम यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षक अनिल गवळी तर आभार मालन बोडरे यांनी मानले.