खंडाळा ! लोणंद येथे रेल्वेच्या धडकेत तरडगावचा तरुण ठार

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
मिरज - पुणे रेल्वे मार्गावर लोणंद रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या फलटण रेल्वे पुलाखाली रेल्वेच्या धडकेत तरडगाव येथील एका युवकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
          मिरज - पुणे रेल्वे मार्गावरील लोणंद रेल्वे स्टेशन नजीकच्या फलटण रेल्वे पुलाखाली रेल्वे रूळ ओलांडताना या रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गोवा - हजरत निजामुद्दिन या एक्स्प्रेस रेल्वे गाडीची काल दि. १७ रोजी पहाटे धडक बसल्याने दत्तात्रय तुळशीराम कदम वय ४०  रा. तरडगाव ता. फलटण यांचा मृत्यु झाला. सदर तरूण हा वेडसर असून नेहमीच या परिसरात भटकत असायचा. अपघाताची माहीती मिळताच वाठार रेल्वे पोलीस स्टेशनच पो.ना. सुरेश शेलार, पो ना एसएस तारू यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सदर अपघाताचा पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.
To Top