भोर ! तालुक्याचा आदर्श इतरांना देऊ : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
गाव व राव एकत्र आले तर विकास साधता येतो. गावच्या विकासासाठी एकत्र राहू व ग्रामविकास साधू. भोर प्रशासनाच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांची शासकीय कामे वेळेत व जलद गतीने होत असतात.भोर तालुका शासकीय सेवा कामांमध्ये तत्पर असल्याने तालुक्याचा आदर्श इतरांना देऊ असे मत जिल्हा ग्राम पुरस्कार प्राप्त इंगवली ता.भोर येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा व विविध शासन सेवांचे वितरण प्रसंगी पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी बोलताना व्यक्त केले.
      यावेळी नवीन रेशनिंग कार्ड वाटप ,पोटखराब क्षेत्र लागवडी योग्य करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना दाखले तसेच पती - पत्नी नावे घर मिळकत दाखले डॉ.देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे ,तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी स्नेहा देव,नायब तहसीलदार गाजरे , विस्तार अधिकारी शिवराज पाटील,अमरजा दंडे,पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, सरपंच सारिका बांदल,ग्रामसेवक प्रसाद शोले,सुनिता संकपाळ,सर्कल प्रशांत ओव्हळ ,तलाठी अतुल निर्मळ ,तसेच शेकडो महिला ग्रामस्थ उपस्थित होते.
     डॉ.देशमुख पुढे म्हणाले ग्रामस्थांच्या मागणीनुसार इंगवली गाव पुस्तकांचे गाव म्हणून लवकरच करू.ज्ञानाच्या माध्यमातून विकास गाठावा लागतो त्यामुळे विकास होण्यासाठी पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानार्जन होणे गरजेचे आहे.
To Top