सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कुल वाणेवाडी व साद संवाद स्वच्छता ग्रुप संयुक्त विद्यमाने गुणवत्ता वाढ वर्ग हा ५ वी व ८ वी स्कॉलरशीप परीक्षा पूर्वतयारी उपक्रम ( दर रविवारी सकाळी ९ ते ११ मोफत कोचिंग) रविवार दि १८ पासून सुरू करण्यात आला .
वाणेवाडी , मुरूम व सोमेश्वर परिसरातील सर्व विद्यार्थी यांच्यासाठी मार्गदर्शन व्हावे , शैक्षणिक पाया मजबूत व्हावा म्हणून हा उपक्रम सुरू करण्याचा हेतू आहे . स्कॉलरशिप परीक्षेच्या तयारीत निष्णात असलेलेकेशवराव जाधव (गुरुजी) व नागेश कोळेकर या तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाने या उपक्रमाची सुरुवात झाली . या कार्यक्रमासाठी निवृत्त कृषिअधिकारी चंद्रशेखर जगताप, लोणीभापकर शाळेचे मुख्याध्यापक संदीप जगताप डॉ प्रदीप भोसले व ऍडव्होकेट नवनाथ भोसले व न्यू इंग्लिश स्कुल वाणेवाडी चे मुख्याध्यापक श्री कांबळे, अशोक भोसले सर ,शिक्षक वर्ग , पालक व सुमारे ५० विद्यार्थी , व साद संवाद स्वच्छता टीम चे सर्व सदस्य उपस्थित राहिले .
संदीप जगताप सरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात , १० वी व बारावी च्या निकाला पेक्षाही आता स्कॉलरशिप परीक्षा ,एनएमएमएस , नवोदय , एनटीएस , एमटीएस,अशा बाह्यपरिक्षा मध्ये किती विद्यार्थी यश प्राप्त करतात त्यावर त्या शाळेचा दर्जा , गुणवत्ता ठरेल . केशव जाधव गुरुजी यांनी अशा परिक्षेची तयारी ही मानसिक कसोट्या ची तयारी असते . कठीण काळात भविष्यात अचूक निर्णय घेण्यासाठी ही तयारी फायदेशीर ठरत असते . शिक्षकांबद्ल तक्रारीत वेळ न घालवता जे जे शिकवतील ते ग्रहण करणे ,आत्मसात करण्याची गोडी लावुन घेणे विद्यार्थ्यांना गरजेचे आहे . आनंदाने , मजेत हसत खेळत शिकत , मन एकाग्र करणे विद्यार्थ्यांनी गरजेचे आहे . मन हाच मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे . त्यावर विजय मिळवला तर अभ्यासात व जीवनात अशक्य असे काहीच नाही असे केशव जाधव गुरुजींनी अनुभवाचे कथन केले . पालक फरांदे मॅडम यांनी पालक शिक्षक संवाद याची गरज बोलून दाखवली . कांबळे सरांनी स्वागत केले . गणेश सावंत यांनी प्रास्ताविक तर डी वाय जगताप सरांनी आभार मांडले . या औपचारिक कार्यक्रमानंतर केशव जाधव गुरुजींनी एक तास मुलांना आकडे व त्याची गंमत यावर छान मार्गदर्शन केले .
दर रविवारी सकाळी ९ ते ११ माजी विद्यार्थी , मित्र , परिचित शिक्षक जे अशा परीक्षा पूर्वतयारी साठी कुशल आहेत यांचे मार्गदर्शन न्यू इंग्लिश स्कुल वाणेवाडी येथे साद संवाद स्वच्छता टीम सातत्याने आयोजित करणार आहे .