सुपे ! सुदाम नेवशे ! 'हिरो'ची सिडी डीलक्स.... रोजचा प्रवास ३५० किमी....! पाच राज्य... ५ हजार ५०० किमीचा प्रवास....! सुपे येथील 'सर्पमित्रा'ची ५० दिवसात चारधाम यात्रा

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : सुदाम नेवसे
बारामती तालुक्यातील सुपे येथील सर्पमित्र व निसर्ग स्पर्श फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यासाठी योगदान देणारे विलास उर्फ भीमा वाघचौरे यांनी दुचाकी वर चारधाम यात्रेचा दि.२९ ऑगस्टपासून सुपे येथून सुरु केलेला प्रवास पूर्ण झाला असून ते परतीच्या मार्गावर आहेत. चारधाम मध्ये उत्तर भारतातील हरिद्वार ,ऋषिकेश, बद्रीनाथ केदारनाथ व दक्षिण भारतातील रामेश्वर,कन्याकुमारी, मदुराई या तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. सुपे ते उत्तरकाशी चारधाम उत्तराखंड असा प्रवास करण्याचा मानस विलास वाघचौरे यांनी केला होता.हा प्रवास त्यांच्या युट्युब अकाउंट वरून प्रदर्शित करण्यात येत आहे चारधाम यात्रा परत करून सुपे येथे येईपर्यंत वाघचौरे यांचा साडेपाच हजार किलोमीटर इतका प्रवास होणार आहे साधारणतः त्यांच्या प्रवासाला ५० दिवसांचा कालावधी लागणार आहे. हिरो कंपनीची एच.एफ.डीलक्स एम .एच.४२ ए.डब्ल्यू.५८५४ या दुचाकीवर प्रवास करीत असताना मोठ्या डोंगररांगा २००कि.मी.चा घाट पार केल्याचे वाघचौरे यांनी नमूद करून दररोज ३०० ते ३५० कि.मी. प्रवास दुचाकी वर करीत असल्याचे सांगितले महाराष्ट्र ,मध्यप्रदेश ,राजस्थान, हरियाणा उत्तरप्रदेश आणि नंतर देवभूमी असा प्रवास करीत असताना मध्यप्रदेश या ठिकाणी सारथी ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला .उज्जैन ,महाकालेश्वर बाबांचे दर्शन घेऊन पुढे राजस्थानच्या दिशेने जात असताना वाटेमध्ये चांगले मित्र हितचिंतक भेटून त्यांनी आदरातिथ्य केले. विलास वाघचौरे यांची दुचाकी वर चारधाम यात्रा करण्याची अनेक दिवसापासून ची इच्छा होती.दुचाकीवर हा प्रवास पूर्ण केल्यानंतर हे पुण्य आई-वडिलांना मिळावे ही कामना वाघचौरे यांनी  बोलताना व्यक्त केली. देवभूमी मध्ये गेल्यानंतर सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची बॅग हरवली त्यामध्ये पैसेही होते मात्र तेथील युवकांनी फोन करून १५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या वाघचौरे यांना ती परत केली या संपूर्ण प्रवासामध्ये दुचाकीच्या किरकोळ अडचणी आल्या असल्या तरी तो प्रवास सुखकर सुरू असल्यामुळे त्यांनी दुचाकीला शोले चित्रपटातील घोडीचे धन्नू हे नाव दिले आहे. विलास वाघचौरे यांनी चारधाम यात्रा पूर्ण केली असून त्यांनी आता यमुनोत्री ते गंगोत्री असा २२३ की.मी.चा प्रवास पूर्ण केला आहे केदारनाथ व बद्रीनाथ पूर्ण केल्यानंतर विलास वाघचौरे यांनी मनस्वी आनंद व्यक्त केला आहे.
To Top