सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : सुदाम नेवसे
सुपे येथील श्री शहाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेचा वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक समारंभ उत्सवात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्या प्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार युगेंद्र पवार हे होते. तर मान्यवर उपस्थितामध्ये पुणे जिल्हा शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य आर. बी. खैरे,जि. प. सदस्य भरत खैरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब पोमणे ,राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष अनिल हिरवे, सुपे ग्रामपंचायतचे माजी सरपंच काशिनाथ कुतवळ ,त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना बक्षीस देणारे मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. आर.बी. खैरे सर यांनी संस्थेच्या विविध धोरणाबाबत माहिती सांगितली. तर अध्यक्षीय भाषणामध्ये युगेंद्र पवार यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करत संस्थेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचे उल्लेखनीय शब्दात अभिनंदन केले.सदर कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयच्या प्राचार्या व्ही. बी. जाधव ,उपप्राचार्य वाय.एस गोवेकर, पर्यवेक्षक बी.के. भालेराव सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख एम. एस. गायकवाड सर यांनी केले.विद्यार्थी पारितोषिक व सत्काराचे नियोजन आर. डी. पानसरे व ए. एल. पवार यांनी केले. आभार ए. ए. पलांडे यांनी मानले