वाई ! कांताबाई खडसरे या राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ 
वाई येथील विठ्ठलराव जगताप नगरपालिका शाळा क्रं. पाचच्या वरिष्ठ मुख्याध्यापिका कांताबाई अनिलकुमार खड़सरेयांना महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका
शिक्षक संघ यांच्यावतीने देणेत येणारा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार देऊन अमरावतीचे खासदार रवी राणा तसेच महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांचे हस्ते गौरविण्यात
आले. 
              विठ्ठलराव जगताप नगरपालिका शाळा क्रं. ५ वाईच्या कांताबाई खडसरे यांच्या नेतृत्वात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आज पर्यंत उज्वल यश संपादन केले आहे. लोकसहभागातून प्रशालेच्या सर्वांगिण विकासा साठी तसेच शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या अतिउत्कृष्ठ कामाची दखल घेवून सौ.खडसरे यांना सन्मानित करण्यात आले. 
    त्यांचे  वाई, खंडाळा- महाबळेश्वर विधानसभेचे
 आमदार मकरंद पाटील तसेच मुख्याधिकारी
किरणकुमार मोरे, गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, प्रशासनाधिकारी साईनाथ वाळेकर शाळा व्यवस्थापन समित सदस्य प्रदिप चोरगे, चरण गायकवाड, सौ.रुपाली बनारसे सौ. शितल शिंदे, सचिन फरांदे, बापूसाहेब जमदाडे, नितीन नायकवडी. अरुण आदलिंगे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. निर्मला चोरगे, उपाध्यक्षा सौ. वैशाली शिंदे, तसेच दिलीप पवार, नगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष शाम पवार, उपाध्यक्ष विलास कोळी, सुरेश दुधाणे तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व विद्यार्थी व पालक, शिक्षक यांनी अभिनंदन केले.
To Top