सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
स्त्री ही सौंदर्य पूजक असते. तसेच स्त्रीयांच्या अंगी सोशिकते बरोबर कल्पकता ही असते.या गुणांचे कौतुक हाच या उपक्रमाचा हेतू आहे तो माझ्या मते सफल झाला आहे असे मत सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी केले.
आधार सोशल फाऊंडेशनच्या वतीने बारामती- पुरंदर तालुक्यासाठी गौरी-गणपती सणाचे औचित्य साधून महिलांच्या कल्पकतेला आव्हान देण्यासाठी व सामाजिक विषयांना प्राधान्य देण्यासाठी संसदरत्न ऑनलाईन गौरी- गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली होती. नुकताच घरगुती स्वरूपाचा बक्षीस वितरण समारंभ वाणेवाडी (ता. बारामती) येथील रामराजे सोसायटीच्या ऑफिसमध्ये पार पडला. यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप , मिलिंद सटाले, डॉ.अमोल जगताप, उद्योजक सुनील धायगुडे, योगेश काळेल, सतीश कदम, चंद्रशेखर माने, किरण जगताप, संकेत जगताप, विनय जाधव, उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये 45 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे व ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक सौ. ऋतुजा विनय जाधव (वाणेवाडी) यांनी लग्न सोहळा हा देखावा सादर केला होता. द्वितीय पारितोषिक डॉ. स्मिता गणेश बोके (बारामती) यांनी गंगा-नर्मदा नदी शुद्धीकरण हा देखावा तर तृतीय पारितोषिक सौ. कल्याणी चंद्रशेखर माने (राख, ता.पुरंदर) यांनी महिलांचे श्रावण महिन्यातील सण व सामाजिक जबाबदारी हा देखावा सादर केला होता.
या स्पर्धेचे परीक्षण प्रा. सौ प्राजक्ता पवार-यादव यांनी काम पाहिले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन रोहित जगताप यांनी केले तर आभार स्वप्निल काकडे यांनी मानले.