मेढा ! प्रतिनिधी : सोमनाथ साखरे ! घराची भिंत कोसळून एक महिला ठार तर तीन महिला गंभीर जखमी : जावली तालुक्यातील दरे बु l येथील घटना

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मेढा : सोमनाथ साखरे
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील दरे बुद्रुक या गावात अंगावर दगडी भिंत कोसळून कुसुम मधु महामुलकर वय 70 या शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर  या घटनेमध्ये  मुक्ताबाई कृष्णा महामुलकर , पद्मावती कृष्णा महामुलकर वय 55 प्रभावती विश्वास मतकर वय 52 अशा तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. 
       जावळी तालुक्यामध्ये कुडाळ भागात गेल्या दहा दिवसापासून सतत पाऊस पडत आहे त्यामुळे बऱ्याच भागात छोटे मोठे नुकसान होत आहेत.कुडाळ मध्ये सुधा पावसाने चांगलाच जोर धरला असताना दहा फूट उंचीची दगडी भिंत कोसळली व भिंतीच्या शेजारी बसलेल्या प्रभावती मतकर मुक्ताबाई महामुलकर कुसुम महामुलकर पद्मावती महामुलकर यांच्या अंगावर दगडी भिंतीचा मलमा कोसळल्याने चारीही महिला भिंतीखाली गाडल्या गेल्या यातच कुसुम महामुलकर यांचा डोक्यात मोठमोठाली दगडी पडून जागीच मृत्यू झाला अन्य  3 महिला गंभीर स्वरूपात जखमी झाल्या अचानकच गावात मोठा आवाज आल्याने युवकांनी धाव घेतली. घटना स्थळी पाहिल्यानंतर दहा फूट उंचीची उंच दगडी भिंत खोलीच्या आतील बाजूस कोसळली होती व यामध्ये मलब्याखाली गाडले गेलेल्या महिलांचा मोठ-मोठ्याने ओरडण्याचा आवाज येत होता स्थानिक युवकांनी भिंतीखाली गाडल्या गेलेल्या तीन महिलांना दगड माती बाजूला काढून मोठ्या शर्तीने बाहेर काढले मात्र अंगावर सहा ते सात फूट दगड मातीचा मलमा खाली पडलेल्या कुसुम महमूलकरला काढण्यात युवकांना वेळ लागला बाहेर त्यांना काही वेळेतच काढल्यानंतर त्या गंभीर स्वरूपामध्ये जखमी झाल्या होत्या बेशुद्ध अवस्थेत होत्या तात्काळ चारीही जखमी महिलांना शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली मात्र उपचारासाठी नेत असतानाच कुसुम महामुलकर यांचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झाला.
To Top