बारामती ! सोमेश्वरनगर येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयातील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यश

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
SVERI's College of Engineering, Pandhpur यांनी “OLYMPUS- 2022" अंतर्गत दि. १५ व १६ सप्टेंबर २०२२ रोजी National Level Event चे आयोजन केलेले होते. सदरच्या Event मध्ये शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी, सोमेश्वरनगर या महाविद्यालयातील विद्यार्थी पानसरे विशाल संजय व कल्याणकर ओंकार अमर या विद्यार्थ्याचा "ब्लड बॅक मॅनेजमेंट सिस्टीम" या प्रोजेक्टला २ रा नंबर मिळालेला आहे. 
         सदर प्रोजेक्टला बक्षिस म्हणून रोख रक्कम रू. ३०००/- व प्रमाणपत्र मिळालेले आहे. तसेच अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड रिसर्च पुणे यांच्या दिनांक १५.०९. २०२२ रोजी इंजिनिअर्स डे निमित्त नॅशनल लेव्हल कॉम्पीटेशन ऑफ इनोव्हेटीव आयडिया अंतर्गत शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी, सोमेश्वरनगर या महाविद्यालयातील विद्यार्थी ठोंबरे नामदेव भगवान, मुठेकर हिम्मत बापुराव, टेकवडे योगेश उत्तम या विद्यार्थ्याचा “आधुनिक खुरपणी यंत्र" या प्रोजेक्टला ३ रा नंबर मिळलेला आहे. सदर प्रोजेक्टला बक्षिस म्हणून रोख रक्कम रू. १५०००/- व प्रमाणपत्र मिळालेले आहे.
           वरील सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय ए. देवकर व सर्व स्टाफचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे. तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष पुरूषोत्तम रा. जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार शां. होळकर व सर्व संचालक मंडळ तसेच संस्थेचे सचिव भारत खोमणे यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.
To Top