सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
वाई पाचगणी रस्त्यावर असणाऱ्या गांधी पेट्रोल पंपा समोर घरघाव वेगात धावणार्या डंपरने स्कुटीला जोराची धडक दिल्याने त्यावरील स्वार असलेले पाटबंधारे विभागातून सेवा निवृत्त झालेले शामराव सहदेव कांबळे वय ७२
राहणार विश्वकोष कॉलनी वाई हे गंभीर जखमी
होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तर सोबत असलेली सिंधांत आणि सुमेध ही दोन्ही नातवंडे गंभीर जखमी झाल्याने त्यांना वाई येथील खाजगी रुग्णालयात ऊपचारा साठी दाखल केले आहे . या अपघाताची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे .
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पाटबंधारे विभागातून सेवा निवृत्त झालेले शामराव सहदेव कांबळे हे वाई येथील विश्वकोष कॉलीनी येथे राहत होते ते दि.१७ रोजी १२ वाजण्याच्या सुमारास नातु सुमेध आणी सिद्धांत यांना द्रविड हायस्कूल मध्ये घरी आणण्या साठी आपल्या स्कुटी या दुचाकी वरुन गेले होते नातवंडे घेऊन ते विश्वकोष येथील आपल्या राहत्या घराकडे परतत असताना त्यांची दुचाकी वाई पाचगणी रोडवर असणार्या गांधी पेट्रोल पंपा समोरील रस्ता १२|४५ वाजण्याच्या सुमारास ओलांडत असताना पाचगणी बाजु कडुन भरघाव वेगात येणार्या एम.एच.११ सी.एच.५४८४ या क्रमांकाच्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने त्यावरील शामराव कांबळे आणी दोन्ही नातवंडे असे तिघेजण गंभीर जखमी झाले त्यांना ऊपचारा साठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील ऊपस्थित डॉक्टरांनी शामराव कांबळे यांना मृत घोषित केले .तर दोन्ही नातवंडे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर ऊपचार सुरु आहेत .
या अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली असुन पोलीसांनी डंपर आणी त्याचा चालक असलेला दशरथ दत्तात्रेय पवार राहणार गोडोली पाचगणी ता.महाबळेश्वर यास ताब्यात घेतले आहे .