सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात मोठ्या विश्रांतीनंतर मागील आठ ते दहा दिवसांपासून अवकाळी पावसाने चांगला जोर धरला असल्याने भाटघर व निरा-देवघर धरण पुन्हा तुडुंब भरून गेले आहेत. यामुळे भाटघर धरणातून ७ हजार तर निरा -देवघर धरणातून ३ हजार ३०० क्युसेकणे नीरा नदी पात्रात विसर्ग सुरू असल्याने नीरा नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे .
तालुक्यात यंदा मान्सून ने चांगलीच सुरुवात केली होती.अनेक दिवस पाऊस जोरदार बरसल्याने भातघर १२ ऑगस्ट तर निरा देवघर धरण १४ ऑगस्टला शंभर टक्के भरले होते.दोन्ही धरणे तुडुंब भरल्यानंतर पुन्हा काही दिवस पाऊस जोरदार बरसला. मात्र त्यानंतर पावसाने मोठी विश्रांती घेतली होती.या विश्रांतीनंतर वरून राजाने आठ ते दहा दिवसांपासून पुन्हा जोरदार बरसत हजेरी लावल्याने भाटघर व निरा- देवघर धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यंदा वरून राजाच्या कृपेने खरीपातील भात पीक जोमात आले असले तरी अतिवृष्टीमुळे कडधान्य पिके वाया गेले असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.
--------------
पूररेषेतील गावांच्या नागरिकांनी सतर्क राहावे
भोर -वेल्हा -मुळशी तालुक्यांमध्ये सध्या पावसाचा जोर कायम आहे.तिन्ही तालुक्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे .तरी पूररेषेतील नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय ााााााा घराबाहेर पडू तसेच कामानिमित्त बाहेर पडणार्या नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये व स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार संग्राम थोपटे यांनी केले आहे.