वाई ! धोम धरणातून ४ हजार ७५० क्वुसेसने कृष्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्याच्या पश्चिम भागात असलेले बलकवडी आणी धोम धरण परिसरात गेल्या चार पाच दिवसा पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसा मुळे  दोन्हीही धरणे१००% टक्के भरल्याने बलकवडी धरणातुन  १७०० क्वुसेस पाणी धोम धरणात सोडल्याने धोम
धरणात वेगाने पाणी पातळीत वाढ होत असल्याने धोम धरण प्रशासनाने दि.१६ रोजी 
४७५० क्वुसेस पाणी कृष्णा नदी पात्रात सोडले असुन नदी पात्राच्या काठावर  दुतर्फा  असणार्या गावातील नागरीकांनी नदी पात्रात 
जनावरे कपडे धुवायला अथवा भांडी घासायला जावु नये असे आवाहन वाईचे तहसीलदार रणजित भोसले बलकवडीचे  कार्यकारी अभियंता अशोक पवार  पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे धोम धरण प्रशासनाचे ऊप 
अभियंता निलेश ठोंबरे यांनी केले आहे .
सविस्तर वृत्त असे कि वाई तालुक्याच्या पश्चिम भागात वाई सातारा कोरेगाव खंडाळा या तालुक्यातील हजारो हेक्टर  शेत जमीनीला
पाणी पुरवठा करणारे धोम धरण आहे पण धरणाच्या वर एक बलकवडी धरण आहे या परिसरात गेल्या चार पाच दिवसा पासून मुसळधार पाऊस पडत असल्याने बलकवडी हे धरण १००% भरले असल्याने त्याच्यातुन दि.१५ रोजी 1 हजार आणी दि.१६ रोजी ७००   क्वुसेस पाणी धोम धरणात सोडल्याने धोमचेही धरण १००% भरल्याने आणी या दोन्ही धरण परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरु असल्याने दोन्ही धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने धोम धरणातुन 
दि.१६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास 
२ हजार २२३ क्वुसेस पाणी सोडण्यात आले होते पण दोन्हीही धरण परिसरात पाऊस थांबत नसल्याने पुन्हा धरणात पाण्याची वाढ 
होतच राहिल्याने धोम धरण प्रशासनाचे ऊप 
अभियंता निलेश ठोंबरे यांच्या आदेशाने दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास २५१४ क्वुसेस पाणी कृष्णा नदी पात्रात सोडण्याचे आदेश दिल्याने 
सध्या नदी पात्रात ऐकुन ४ हजार ७५० क्वुसेस पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे .   
बलकवडी धरण सुरक्षे साठी कनिष्ठ अभियंता असलेले एस.आर.बोरसे हे २४ तास कार्यकारी  अभियंता यांच्या मार्गदर्शना खाली धरणावर 
थांबुन प्रत्येक तासाला वाढती पाणी पातळी मोजण्याचे काम करत आहेत .तर धोम धरण प्रशासनाचे ऊप अभियंता  निलेश ठोंबरे यांच्या मार्गदर्शना खाली प्रकाश मांढरे दिगंबर थोरवे अविनाश सोनावणे संजय कांबळे संतोष जाधव केदार भाडळकर हे धोम धरण कर्मचारी २४ तास धरणाच्या सुरक्षे साठी  धरणावर थांबुन प्रत्येक तासाला वाढती  पाणी  पातळी मोजण्याचे काम करीत असतात .वरील दोन्ही धरण व्यवस्था पणा मधील असंख्य कर्मचारी आणी अधिकारी सेवा निवृत्त झाल्याने माणसीक बळ हे बोटावर मोजण्या इतकेच शिल्लक राहिल्याने या मोजक्याच कर्मचारी वर्गावर धोम आणी बलकवडी या दोन्ही धरणांच्या सुरक्षेची जबाबदारी येऊन पडली आहे .तरी राज्य सरकारने या गंभीर विषयांचा गांभीर्याने विचार करुन धरणाच्या सुरक्षेचा विचार करुन नोकर भर्ती करावी अशी मागणी वाई तालुक्यातील जनतेने केली आहे ..
To Top