सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
राज्याचे पणन महासंचालक असलेल्या एक वरिष्ठ अधिकारी बेपत्ता होण्याची घटना घडली असून या घटनेमुळे झाली असून याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल करण्यात आली आहे. तर सारोळा नदीवरून एका व्यक्तीने उडी मारल्याची घटना उघडकीस आली असून नदीपात्रामध्ये युद्धपातळीवर शोध कार्य सुरू असून घटनास्थळी महसूलचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत.
शशिकांत पतंगराव घोरपडे असे वरिष्ठ अधिकारी बेपत्ता होण्याची घटना झाली असून घोरपडे यांचे शेवटचे लोकेशन शिरवळ येथे दिसून आले. याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये गुरुवार दी.१३ पहाटे हरवल्याची तक्रार देण्यात आली आहे. शिरवळ येथील नीरा नदीच्या पात्रालगत एका हॉटेलपासून एक व्यक्ती चालत पूलाकडे जात असल्याचे दिसून आले. यामुळे नेमके कोणत्या व्यक्तीने नदीपात्रात उडी मारली आहे. याबाबत स्पष्टता होत आहे. घटनास्थळी राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील पोलीस नाईक गणेश लडकत, शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल बारेला तसेच पोलिस हवलदार आप्पासाहेब कोलवडकर दाखल झाले आहेत. महाबळेश्वर टेकर्स, शिरवळ शिरवळ रेस्क्यू टीम, भोर आपत्ती व्यवस्थापनचे, भोईराज जलआपत्ती असे एकूण ४५ अधिक शोधकार्य घेत आहे.