सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर-वेल्हा तालुक्यात उद्योगासाठी पोषक वातावरण असतानाही औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या नाहीत. छोट्या-मोठ्या उद्योगांचीही निर्मिती झाली नाही.उद्योग व्यवसाय वाढीच्या राजकीय उदासीनतेकडे दुर्लक्ष करून व्यवसाय तसेच स्वतःची प्रगती साधता येते.त्यासाठी गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची म्हणूनच उद्योजक व्हा, महिलांसाठी व तरूणांसाठी उद्योजक मेळावा रविवारी दि -१६ सायंकाळी ४ वाजता शिवमंगल लॉन्स पांडे, ता.भोर येथे आयोजित करण्यात आला असून प्रा.नामदेवराव जाधव यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे अशी माहिती शुरविर मावळी संघटना, भोरचे अध्यक्ष वैभव धाडवेपाटील यांनी दिली.
धाडवे पाटील यांनी दिलेल्या निवेदनानुसार आपण उद्योग व्यवसाय विसरलोय व्यवसायिक होवून उद्योजक व्हा आणि प्रगती साधा.महिला बचत गटाच्या माध्यमातून काही प्रमाणात स्वावलंबी होताना दिसतात.त्या महिला कर्ज काढून प्रसंगी घरकाम करून कुटूंबाच्या गरजा भागवत आहेत. केवळ कर्ज काढले म्हणजे व्यवसाय होत नाही. त्यासाठी व्यावसायिक दृष्टी तसेच सुयोग्य मार्गदर्शनाची गरज असते.ती व्यवसायिक दृष्टी नेमकी काय असते ते जाणून घेण्यासाठी उद्योजक मेळाव्यामध्ये सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले आहे.
यासाठी लागणारी बाजारपेठ अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर पुणे शहराच्या रुपात जागतिक पातळीवर उपलब्ध आहे. नवनवीन नवीन तंत्रज्ञान तसेच कलाकौशल्य या माध्यमातून जगभरातील युवक आपली प्रगती पुण्यात येऊन करत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून भोर-वेल्हा येथील युवकांनी नाविन्याचा ध्यास घेऊन स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजेअसेही त्यांनी सांगितले आहे.