सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर : सुनील जाधव
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे, दोन दिवस मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे, ओडे -नाले भरून वाहत आहेत. यामध्ये आज अचानक एक ५५ वर्षीय नरेश साळवे इसम वाहून गेला आहे.
शोधकार्य चालू आहे पोलीस प्रशासन उपस्थित आहे अद्यापही या व्यक्तीचा पत्ता लागलेला नाही. सलग दोन दिवसाच्या पावसाच्या पाण्यामुळे वडगाव निंबाळकर येथील बाजार तर लगतचा आणि ओढ्या वरील पुलावरून पाणी वाहत आहे.