भोर ! बातमीदार विजय जाधव आंतरराष्ट्रीय पत्रकारीता पुरस्काराने सन्मानित

Admin
2 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुका बातमीदार प्रा. विजय जाधव यांना मॉरीशस देशातील मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन यांच्यावतीने  'आंतरराष्ट्रीय डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पत्रकारीता पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
         मॉरिशस येथील मोका शहरातील मॉरिशस विद्यापीठात २७ सप्टेबर रोजी मॉरीशस चे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपन यांच्या हस्ते हा पुरस्कार विजय जाधव यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
वीस  वर्षांपासून पत्रकारीता आणि कॉम्प्युटर शिक्षण क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल पत्रकार विजय जाधव यांना हा पुरस्कार देण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मॉरिशस विद्यापीठाच्या महात्मा गांधी इन्टिट्युटच्या सभागृहात हा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी मॉरिशसच्या उपपंतप्रधान लिलादेवी डुकून, परराष्ट्रमंत्री एलन गणू, मॉरिशस  मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष असंत गोविंद, मॉरिशसच्या मोका चे जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष सुधीरचंद्र  सूनराने,  भारताच्या मॉरीशस मधील राजदूत के नंदिनी सिंगला, भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, फुले शाहू आंबेडकर विचार प्रासारक मंडळाचे 
कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव, पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे,  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, डॉ. सुरेश गोरेगावकर, प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, बार्टीचे माजी संचालक रवींद्र चव्हाण, वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर, दिलीप ठाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top