शिरोळ ! चंद्रकांत भाट ! शिरोळ शहराला होणार गतवैभव प्राप्त : प्रशासनाच्या सहकार्यातून कल्लेश्वर तलावाला मिळणार नवसंजीवनी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
शिरोळ : चंद्रकांत भाट
शिरोळ शहरात असणार्‍या ऐतिहासिक श्री कल्लेश्वर तलाव गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित होता. सर्व प्रशासनाच्या माध्यमातून या तलावाला नवसंजीवनी मिळाली आहे. सध्या 5 कोटी रूपये निधीतून तलावाचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. सध्या हे काम 70 टक्के पुर्ण झाल्याने हा तलाव शिरोळ शहरात गतवैभव देणारा ठरणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील यांनी केले.
               एकेकाळी संपूर्ण गावाला पिण्याचे पाणी देणारा तलाव म्हणून कल्लेश्वर तलावाची ख्याती होती कालांतराने शासनाच्या माध्यमातून शहरात नळ पाणी योजना कार्यान्वित झाली त्यामुळे या तलावाकडे दुर्लक्ष झाले आणि ऐतिहासिक असणाऱ्या कल्लेश्वर तलावाची दुर्दशा होत राहिली पण नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि गावातील लोकप्रतिनिधींनी तलावास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला त्यामुळे शिरोळ येथे श्री कल्लेश्वर तलावाचे काम सुरू आहे. दरम्यान, नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, मुख्याधिकारी अभिजित हराळे नगरसेवक योगेश पुजारी सामाजिक कार्यकर्ते आण्‍णासो पुजारी सुरज कांबळे यांच्यासह नगरसेवकांनी व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष पाटील बोलत होते. पुढे नगराध्यक्ष पाटील म्हणाले, तालुक्याचे ठिकाण असलेल्या शिरोळमध्ये तहसिलदार कार्यालयासमोर ऐतिहासिक कल्लेश्वर तलाव आहे. या तलावाचे सुशोभिकरण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते. अखेर वैशिष्ट्यपुर्ण योजनेतून विशेष अनुदान अंतर्गत कल्लेश्वर तलाव सुशोभिकरण करण्याचे काम सण 2020 मध्ये घेण्यात आले. यामध्ये तलाव सुशोभिकरण करणे, जेष्ठ नागरीकांनी बसण्याची व्यवस्था, आकर्षक विद्युतीकरण, नागरीकांसाठी फुटपाथ, नाना-नानी पार्क, ओपन जीम, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी, कपांऊड असे काम सध्या आघाडीवर असून 70 टक्के काम पुर्ण झाले आहे.
                  शिरोळ नगरपालिका स्थापन झाल्यापासून शहराच्या विकासाला गती मिळाली आहे. विविध कामे पुर्ण होत असताना ऐतिहासिक कल्लेश्वर तलाव ही कात टाकत आहे. हे काम पुर्ण झाल्यानंतर शिरोळच्या नागरीकांना एक निसर्गरम्य परिसर तयार होईल व शिरोळच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच कल्लेश्वर तलाव परिसरातील उपनगरांमधील तलावात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शुद्ध करून तलावात सोडण्यात येणार आहे यासाठी लागणारा निधी शासनाकडून उपलब्ध करून घेतला जाईल असेही पाटील यांनी सांगितले
To Top