सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : संतोष म्हस्के
पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक ,शिक्षिका संघ,पुणे जिल्हा टी. डि.एफ यांच्या वतीने भोर येथे जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमात दिपाली संजय तुपे उपशिक्षिका जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल भोर. यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे,प्रमुख पाहुणे विश्वस्त महाराष्ट्र राज्य टी.डी .एफ के. एस. ढोमसे , राज्य कार्याध्यक्ष जी के थोरात यांच्या हस्ते तालुकास्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी माजी पंचायत समिती सभापती बाळासाहेब थोपटे, भोर तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा गीतांजली शेटे, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष साखरे , पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले , पुणे जिल्हा टी.डी.एफ अध्यक्ष मुरलीधर मांजरे, रमेश बुदगुडे , माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ दामगुडे, टी.डि.एफ तालुकाध्यक्ष जयवंत थोपटे, महिला अध्यक्षा माया तळेकर,भोर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह संजय तळेकर तसेच स्वागताध्यक्ष धोंडिबा कुमकर व तालुक्यातील सर्व शिक्षण प्रेमी उपस्थित होते.