भोर ! ६६ वा धम्म चक्रप्रवर्तनदिन साजरा : शेकडो आंबेडकरी अनुयायींची उपस्थिती

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी लाखो बौध्द बांधवांना धम्म दिक्षा दिली . यानिमित्त भोर येथील दीक्षा भूमी येथे विजयादशमीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ६६ वा धम्म चक्रप्रवर्तन दीन साजरा केला.यावेळी शेकडो आंबेडकर प्रेमींनी परिसर फुलून गेला होता. 
         यावेळी भारतीय बौद्ध महासभा, दिक्षाभूमी स्मारक समिती,आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटना, पदाधिकारी यांच्यावतीने एसटी बस स्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,आहिल्याबाई होळकर अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.तर  दिक्षा भूमी स्मारक येथे उपस्थित भंते हर्षवर्धन व भारतीय बौद्ध महासभा शाखा भोर तालुकाध्यक्ष रामचंद्र रणखांबे, सचिव रुपेश जाधव, विश्वास शेलार, शंकर भालेराव, अनिता हांडे, संध्या गायकवाड, रुपाली जाधव यांच्या हस्ते बुध्द भीम रूपाना पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा भोर तालुकाध्यक्ष आनंदा गायकवाड, खंडू गायकवाड,पोपट चव्हाण, अविनाश गायकवाड, दिक्षा भूमी स्मारक समितीचे अर्जून शेलार, राजन घोडेस्वार, मनोहर मोरे, रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष सुनिल गायकवाड, युवा अध्यक्ष स्वप्नील सावंत, विजय ओव्हाळ, रिपब्लिकन सेना विधानसभा अध्यक्ष किशोर आमोलिक, सम्राटांनचा सम्राट ग्रुपचे बाळासाहेब शिंदे, डॉ.प्रशांत सपकाळ, गौतम शेलार, सतीश गायकवाड, शिलरत्न दिपंकर आदींसह आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.
To Top