सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील शिवतीर्थ चौपाटी येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सकल मराठा समाज संघटनेच्या शाखेचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर नतमस्तक होत शस्त्र पूजन करून भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी फलकाचे अनावरण केले. तर पुणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी शस्त्र पूजन केले.
यावेळी आमदार थोपटे म्हणाले मराठा समाजाच्या आरक्षणासारख्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत,आरक्षण प्रश्नावर महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून स्वतः दिल्लीमध्ये महामहीम राष्ट्रपती यांची भेट देखील घेतलेली आहे. शासन दरबारी हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी प्रयत्नशील आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे , नगरपालिका गटनेते सचिन हरणस्कर, नगरसेवक गणेश पवार, सुमंत शेटे, जगदीश किर्वे,ऍड.विश्वनाथ रोमन, त्याचप्रमाणे संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष संजय भेलके, उपाध्यक्ष युवराज जेधे, संदीप शेटे, कार्याध्यक्ष सोमनाथ ढवळे, खजिनदार विजय अंबवले, सचिव सचिन देशमुख सदस्य महेश भेलके, उत्तम शिंदे, दीपक शेटे, रवी कंक, निलेश खरमरे, महेश शेटे, सारंग शेटे, भूषण खोपडे, ऍड.जयश्री शिंदे, भालचंद्र मळेकर तसेच नितीन कुडले हे उपस्थित होते.