सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
टीईटी परिक्षेतील घोटाळे कायमचे बंद करण्यासाठी राज्यशासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) घेण्यासाठी आग्रही आहोत. तसेच २००५ पूर्वी विनाअनुदानित शाळांवरवर नियुक्त असलेल्या शिक्षकांनाही जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल, असे आश्वासन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी दिली.

शारदानगर (ता. बारामती) येथील कृषी भवनमध्ये बारामती तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने बारामती तालुक्यातील गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव आसगावकर यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार दत्तात्रेय सावंत होते. याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड, विस्तार अधिकारी संजय जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, सुधाकर जगदाळे, कुंडलिक मेमाणे, सूर्यकांत मुंढे, रामचंद्र नातू, संजय जाधव, नागनाथ ठेंगल उपस्थित होते. याप्रसंगी दहावी बोर्ड, एमएच-सीईटी, शिष्यवृत्ती यामधील प्रथम तीन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. शंभर टक्के निकाल प्राप्त करणाऱ्या ३१ शाळांनाही सन्मानित केले.
पवित्र पोर्टलमार्फत नागपूरचा शिक्षक कोल्हापूरला आणि पुण्याचा माणूस गोंदियाला गेला. त्याऐवजी विभागवार नियुक्त्या करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा तसेच २००५ पूर्वी विनाअनुादानित शाळांवर नियुक्त असलेल्या शिक्षकांनाही जुनी पेन्शन योजना मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहू असा शब्द त्यांनी दिला. शारदानगरच्या सायन्स इनोव्हेशन अँड. अॅक्टीव्हिटी सेंटरला तालुक्यातील सर्व विद्यालयांचे विद्यार्थी जोडण्यासाठी निधी उपलब्ध करण्यास हातभार लावू आणि जिल्ह्यातील सर्व विद्यालयांना प्रिंटर देऊ असेही त्यांनी सांगितले. माजी आमदार सावंत म्हणाले, लोकप्रतिनिधी नसलो तरी सत्याग्रही पध्दतीने शिक्षकांच्या प्रश्नासाठी आंदोलन सुरूच ठेवणार अशी ग्वाही दिली.
प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे तालुका सचिव संदीप जगताप यांनी केले. बाळासाहेब थोरात यांनी सूत्रसंचालन केले तर आभार अनिल धुमाळ यांनी मानले. सिकंदर शेख, राजेंद्र धायगुडे, गणपत गवळी, जयवंत नाकुरे, शब्बीर इनामदार, नंदकुमार पवार, दत्तात्रेय इंगळे, चंद्रकांत जराड आदींनी संयोजन केले.
-------------------------------
गुणवंत पुरस्काराने गौरविण्यात आलेले मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुढीलप्रमाणे-
गुणवंत मुख्याध्यापक - रवीकिरण हरिदास शिंदे (नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे), हेमलता तानाजी कर्चे (आनंद विद्यालय होळ),
गुणवंत शिक्षक - संजय गबाजी आटोळे (म.ए.सो.विद्यालय बाारमती), विजय अण्णा साळुंखे (वसंतराव पवार विद्यालय देऊळगाव), अशोक नारायण भोसले (न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी), सुनिता देवराज देवकाते (विठ्ठल विद्यालय कांबळेश्वर), ऐनुद्दीन अकबर काझी (न्यू इंग्लिश स्कूल मेखळी), जयराम चिमाजी सवाणे (के. बी. विद्यालय सांगवी), डॉ. करूणा दयानंद माने-कोरे (उत्कर्ष आश्रमशाळा).
गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी - विश्वास तांबे (शारदाबाई पवार विद्यामंदिर शारदानगर), मधुकर पांडुरंग रेवगे (स्वातंत्र्य विद्यामंदिर वडगाव निं.), सुधीर मारूतराव ओवाळ (वसतीगृह विद्यालय काऱ्हाटी), रवींद्र नानासाहेब कांबळे (शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर)
गुणवंत अधिकारी - शिवाजी लक्ष्मण खराडे (सहा. लेखाधिकारी जि.प. पुणे).
---