सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
माळेगाव कारखान्याच्या ९० टक्के सभासदांनी दहा गावे जोडण्याच्या निर्णयाला विरोध केला असताना नेत्यांनी हे पाप करणे उचित नव्हे. केवळ राजकीय सोयीसाठी हा खेळ मांडला असून सभासदांच्या अस्तित्वावर घाला घालायचे काम सुरू आहे. नेते लोकशाही मानत असतील तर त्यांनी माळेगाव कारखान्यावर येऊ नये. आणि जरी आलेच त्यांना मोळी टाकण्यापासून आम्ही अडवणार असून काळे झेंडे देखील दाखवणार असल्याचा इशारा माळेगाव कारखान्याचे मा.अध्यक्ष रंजन तावरे यांनी दिला आहे.
सोमेश्वर कारखान्याने वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यक्षेत्रातील दहा गावे जोडण्याच्या ठरावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर माळेगाव च्या सभासदांनी दहा गावे जोडण्याला कडाडून विरोध केला आहे. दहा गावे जोडण्याच्या विषयाने तालुका ढवळून निघाला आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार हे दि ९ रोजी सोमेश्वर आणि माळेगाव कारखान्यावर गळीत हंगाम शुभारंभासाठी येत आहेत. मात्र अजित पवार यांना मोळी टाकण्यापासून आपण रोखणार असून काळे झेंडे देखील दाखवणार असल्याचा इशारा रंजन तावरे यांनी दिला आहे. याबाबत सोमेश्वर रिपोर्टर शी बोलताना ते म्हणाले, दहा गावे माळेगाव ला जोडली जाऊ नये असा आमचा प्रयत्न राहणार आहे. सोमेश्वर कारखान्याचे विस्तारीकरण झालेले असताना तीन पिढ्यांच्या सभासदांना काढून टाकायचे आणि दुसरीकडे जा म्हणायचे. केवळ राजकारणापायी हा खेळ मांडला आहे. दहा गावे जोडण्यामागाचे खरे कारण हे आहे.
दहा गावातील सभासदांचा ऊस पाहता त्यांच्या ऊसाचे गाळप हे चार दिवसांचे आहे. त्यामुळे माळेगावला असा काय मोठा फरक पडणार आहे. मंग सोमेश्वरचे विस्तारीकरण झालेले असताना सोमेश्वरला ऊसाची गरज असताना दहा गावे माळेगाव ला जोडण्याचा खटाटोप कशासाठी? असा सवाल करत यामध्ये केवळ राजकीय स्वार्थ आहे यापेक्षा वेगळं काही नाही. कायदा काय सांगतो की सभासदाची इच्छा असेल तरच त्याचे सभासदत्व रद्द करता येते. त्यामुळे दि ९ रोजी माळेगाव कारखान्याची मोळी टाकण्यासाठी अजित पवार यांना अडवणार असल्याचे तावरे यांनी सांगितले.
COMMENTS