वाई बिग ब्रेकिंग ! दौलतराव पिसाळ ! वाई येथील फिरायला गेलेले पाच तरुण कर्देबीचवर बुडाले : चार जणांना वाचवण्यात यश, पाचगणीचा एक तरुण अद्याप बेपत्ता

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : दौलतराव पिसाळ 
वाई तालुक्यातील एकसर गावच्या पाच तरुण
दोपोली तालुक्यातील कर्देबीच येथे समुद्रात पोहताना बुडत असताना  तेथील सरपंचासह स्थानिक ग्रामस्थांनसह मच्छीमारी करणार्या नाकरीकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत दिले जिवदान .पण पाचगणी येथील रहिवासी असलेला आणी शालेय शिक्षण घेत असलेले सौरभ प्रकाश धावरे हा अद्याप सापडला नसल्याने त्याचा शोध दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विवेक अहिरे व सहकारी घेत आहेत .
         एकसर ता.वाई येथील पाच तरुण आणी पाचगणी ता.महाबळेश्वर येथील एक तरुण असे ६ जण दापोली तालुक्यातील समुद्र काठावर असणार्या   हर्णेबंदर येथे फिरावयास  गेले होते .हे सर्वजण पोहण्या साठी पाण्यात ऊतरले असता सर्वजण समुद्राच्या आलेल्या लाटे बरोबर आत ओढले जावु लागले त्या वेळी सगळ्यांनी आरडा ओरडा केल्याने किनार पट्टीवर ऊपस्थित असणारे हर्णे गावचे सरपंच सचिन तोडनकर मच्छीमारी करणारे ग्रामस्थांना वाचवा वाचवा हा आवाज कानी पडताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने हाती दोर घेऊन बुडत असलेल्या एकसर ता.वाई गावातील पाच तरुणांना वाचविण्या शर्तीचे प्रयत्न केल्याने त्यांचे प्राण वाचले पण पाचगणी येथील रहिवासी असलेला सौरभ प्रकाश धावरे वय १८ वर्ष हा समुद्रात खोलवर गेल्याने तो बेपत्ता झाला .या गंभीर घटनेची माहिती  दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनेक अहिरे यांना समजताच त्यांनी तातडीने पिएसआय पड्याळ पोलिस हवलदार दिपक गोरे सुशील मोहिते के.एन .पटेकर सुजीत तलवडकर पोलिस वाहन चालक मोहन देसाई  यांना सोबत घेऊन कर्दे बीच येथील    घटना स्थळावर पोहचुन तेथील सरपंच सचिन तोडनकर स्थानिक ग्रामस्थ आणी मच्छीमारी करणार्या नाकरीकांच्या मदतीने बोटीच्या साह्याने बेपत्ता असलेला सौरभ प्रकाश धावले वय १८ वर्षे याचा शोध युध्द पातळी वर  सुरू 
केला होता .पण आज पोर्णिमा असल्याने समुद्राला भर्ती येते त्या वेळी मोठ्या प्रमाणात लाटा उसळत असतात या लाटांनीच सौरभला  समुद्राच्या मध्य भागी खेचुन नेहला असावा हा दृष्टीकोन डोळ्या समोर ठेवून पोलिस निरिक्षक विवेक अहिरे यांनी शोध मोहीम दिवसभर सुरु ठेवली होती पण सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अंधार पडल्याने हि मोहीम थांबली होती .
         कार्तिक घाडगे दिनेश चव्हाण अक्षय शेलार कृणाल घाडगे यश घाडगे सर्व राहणार एकसर ता.वाई हे पाचही तरुण समुद्रात बुडत असताना त्यांचा वाचवा वाचवा असा आवाज कानावर पडताच ओमकार नरवणकर मकरंद तोडनकर सरपंच सचिन तोडनकर यांनी स्वताच्या प्राणाची बाजी लावून समुद्राच्या लाटांनवर स्वार होऊन त्यांचे जीव वाचवले आहेत .त्यांचे दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विवेक अहिरे व सहकारी अधिकारी आणी पोलिसांनी कौतुक केले आहे .पण दुर्दैवाने यश घाडगेचा १८ वर्षाचा मावस भाऊ असलेला प्रकाश धावरे हा बेपत्ता झाला आहे
To Top