सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील पिसुरटी येथील राजेंद्र बरकडे यांनी दिग्दर्शित व निर्माण केलेल्या 'वाघर एक वास्तव' या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, मा. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व पुरंदर चे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे होते. यावेळी आमदार संजय जगताप, जिल्हा बँक अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, शहाजी काकडे, प्रमोद काकडे, सुदाम इंगळे, छत्रपती चे अध्यक्ष प्रशांत काटे, राजवर्धन शिंदे, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, सचिन सातव, नीता फरांदे आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातील वास्तववादी कथानकाला धरून वाघर चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. मागास, वंचित किंबहुना पुढारलेल्या समाजाचे ही समाजिकीकरण व्हावे हा उदात्त हेतू ठेवण्यात आला आहे. चित्रपटाची मूळ कथा धनगर समाज व्यवस्थेवर आधारित असली तरीही कथा सर्व समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब म्हणून पुढे आली आहे. सर्वांच्या रोजच्या जगण्याचा भाग असलेले कथानक या वाघर चित्रपटाचे आहे.
रूढी, परंपरा, जाती पाती, पुढारलेला मागासलेला या सर्वांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून पाहिले पाहिजे हा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामीण जीवनाच्या जडणघडणीचा अभ्यास करणाऱ्या लोकांचे करिता हा सिनेमा एक पर्वणी ठरणार आहे.
स्त्री आणि तिच्यावरील मालकी हक्क, भावना, प्रेम, क्रूरता, निरागसता आणि मौज मज्जा या सर्वांचा संगम म्हणजे वाघर हा सिनेमा आहे.
पडद्यावर आणि पडद्याच्या पाठीमागे अनेक कलाकार यांच्या सपोर्ट सिस्टीम यांचे कष्टाचे फळ म्हणजे वाघर......
वाघर .......एक वास्तव हा चित्रपट १४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होत आहे.