सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
लोकशाहीचा पार खेळखंडोबा झालाय आणि हे म्हणतात सर्वसामान्यांचं सरकार आहे; माणसं सभेला आपणहून आली होती. अरे आपणहून आलेली माणसं मग उठून का गेली? माझ्या आजच्या सभेला शेवटचा माणूससुद्धा उठला नाही.असे सोमेश्वर कारखाना स्थळी पार पडलेल्या सभे दरम्यान सभे कडील गर्दीकडे बोट दाखवत अजितदादा म्हणाले. कारण मी गद्दारी करून इथं बसलो नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार बोलताच क्षणी सभागृहात उपस्थितांच्या टाळ्या पडल्या. दरम्यान अजित पवार बोलता असताना एकच वादा...अजितदादा अशी सभागृहात बसलेल्या अँड. हेमंत गायकवाड यांनी घोषणा दिल्या. त्यावर अजित पवार यांनी वाघळवाडी ग्रामपंचायत सद्स असलेले हेमंत गायकवाड यांच्याकडे पहात अजून जिल्हा परिषद-पंचायत समिती लांब आहे. तोपर्यंत अजून जोर राहुद्या. तुम्हाला पुढील कार्यास शुभेच्छा म्हणत अजित पवारांनी सभागृहातच शुभेच्छा दिल्या.
सध्या राज्यात शिवसेना आणि शिंदे गट यांचा नुकताच दसरा मेळावा पार यावेळी कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करत कोणाच्या मेळाव्यात जास्त गर्दी होती. याबाबत चर्चा सुरू आहे. परंतु याचाच धागा पकडत अजित पवार यांनी सोमेश्वर कारखान्याच्या उदघाटन कार्यक्रमा करिता आलेल्या सभागृहात तील उपस्थिताच्याकडे बोट दाखवत म्हणाले की, आजच्या सभेला आलेला शेवटचा माणूससुद्धा उठला नाही. कारण मी गद्दारी करून इथं बसलो नाही. असे म्हणताच सभागृहात एकच वादा... अजितदादा...या घोषणाबाजी देत अजित पवार यांच्यावर असलेले कार्यकर्त्यांचे प्रेम अधोरेखित झाले.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ पवार यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी मंत्री दत्तात्रेय भरणे होते. पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, चेअरमन पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, संभाजी होळकर, माणिक झेंडे, दत्तात्रय येळे, सतीश खोमणे उपस्थित होते.