सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कर्देबीच येथील समुद्रात पाचगणीच्या प्रकाश धावरे या १८ वर्षीय तरुणाचा मृतदेह दापोली पोलिसांनी तब्बल १६ तास अथक परिश्रम घेऊन स्थानिकांच्या मदतीने शोधुन काढला .
दापोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी की एकसर ता.वाई येथील पाच तरुण आणी पाचगणी येथील एक असे सहा जण कोजागिरी पोर्णिमा साजरी करण्या साठी दापोली तालुक्यातील कर्देबीच येथील समुद्र काठावर आले होते .ते सर्वच दुपारी एक वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोहण्या साठी ऊतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात ओढले जावु लागले .आपण बुडणार हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडा ओरडा केल्याने किनार्यावर असणार्या नागरीकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने दोर टाकून पाच जणांचे प्राण वाचवले
परंतु पाचगणी येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात ११ वी चे शिक्षण घेत असलेला प्रकाश धावरे हा बेपत्ता झाला .त्याचा शोध घेतला पण सापडला नाही .
पण दोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शना खाली रविवारी पहाटे पासून हर्णे दुर क्षेत्राचे अंमलदार डी.पी.गोरे एस.वाय.मोहिते .बी.बी.नवाने के.एन .पटेकर .या पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते या पोलिस पथकाने स्थानिक सरपंच सचिन तोडनकर पोलिस पाटील सोनल खामकर शैलेश जाधव ओमकार नरवणकर व इतर ग्रामस्थांचे सहकार्य घेऊन शोध मोहीम गतीमान करुन मृतदेह शोधुन काढण्यास यश मिळविले .मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा करून तो शवविच्छेदना साठी दोपोली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला .सौरभच्या या अकाली निधनाने पाचगणी परिसरात शोककळा पसरली आहे .