जावली तालुका पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी सूर्यकांत जोशी, उपाध्यक्षपदी संदीप गाडवे तर खजिनदारपदी विश्वनाथ डिगे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टिम--------
जावली : प्रतिनिधी (धनंजय गोरे)
अखिल  भारतीय  मराठी  पत्रकार  संघाशी  संलग्न असलेल्या जावली  तालुका पत्रकार  संघाच्या  कार्याध्यक्षपदी सूर्यकांत जोशी,  उपाध्यक्ष पदी संदीप  गाडवे व खजिनदार  पदी  विश्वनाथ डिगे यांची  सर्वानुमते  निवड  करण्यात आली.
           जावली  तालुका पत्रकार संघ  गेल्या चाळीस  वर्षांपासून कार्यरत आहे. पत्रकार  संघाच्या  माध्यमातून नेहमीच  विविध सामाजिक उपक्रम राबवले  जातात. पत्रकार  संघाच्या  सदस्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा  फोडून सर्वासामान्य जनतेला  न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.जावली  तालुक्यातील अधिकृत  मान्यताप्राप्त पत्रकार संघ म्हणून या पत्रकार संघाची  ख्याती आहे.नूतन पदाधिकारी निवडीने  पत्रकार संघाच्या  कार्याला अधिक  बळकटी मिळाली आहे. असे प्रतिपादन अध्यक्ष शशिकांत  गुरव  यांनी केले.
          जावली तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणी व सदस्य यांची  पत्रकार संघाच्या रिक्त असलेल्या कार्यकारिणी मधील  पदांच्या  निवडी  साठी  पत्रकार  संघांचे  अध्यक्ष शशिकांत  गुरव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष  सभा  बोलावण्यात आली होती.यावेळी पत्रकार  संघांचे  संघटक नारायणराव  शिंगटे गुरुजी, सचिव धनंजय गोरे,जेष्ठ  पत्रकार सुरेश पार्टे,रवी  गावडे, किशोर  बोराटे, भास्कर धनावडे,सोमनाथ  साखरे, रघुनाथ पार्टे, संजय दळवी प्रशांत गुजर,मोहन जगताप. सूर्यकांत पवार, नंदू गाडगीळ,विजय  सपकाळ, चैतन्य गाडगीळ,सुहास भोसले,विशाल जमदाडे, युवराज धुमाळ, बजरंग  चौधरी, निलेश  शिंदे, सुनील धनावडे, अभिजित  शिंगटे, नारायण जाधव,प्रसन्न पवार व सदस्य उपस्थित होते.जावली तालुका पत्रकार संघाच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
To Top