भोर ! शिक्षणामुळे माणसाच्या जीवनात सर्वांगीण प्रगती : समीर घोडेकर

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
शिक्षणामुळे माणसाच्या जीवनात सर्वांगीण प्रगतीची दारे खुली होतात. शिक्षणाचे महत्त्व जाणून आपल्या जीवनाचा कायापालट करण्यासाठी अभ्यासू वृत्ती अंगीकारली पाहिजे.भविष्यात यशस्वी शिक्षण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर घोडेकर यांनी बोलताना केले.                                                                        भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम डोंगरी भागातील आपटी ता.भोर येथे अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कै.रमेश लक्ष्मण घोडेकर यांच्या  द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी सामाजिक , वैद्यकीय , राजकीय , ऐतिहासिक व समाजसुधारक चरित्रे असलेल्या ७० मार्गदर्शन पुस्तकांचे वाटप करण्यात आले.स्मृतिदिनानिमित्त सामाजिक उत्तरदायित्व जपण्यासाठी पुस्तके देण्यात आली. याप्रसंगी भोर तालुक्यातील जेष्ठ वारकरी ह.भ. प.ज्ञानेश्वर अंबवले, श्रीमती सिंधुताई घोडेकर,  बांधकाम व्यावसायिक सुनिल घोडेकर,छेडा इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मनुष्यबळ विभाग अधिकारी श्रद्धा घोडेकर ,गौरव आंबवले अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.अँड.राहुल महाराज पारठे, संस्थेचे सचिव लक्ष्मण पारठे उपस्थित होते.

To Top