भोर : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला : देगाव येथे घरफोडीत दोन लाखांची रोखड लंपास

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
 पुणे सातारा महामार्गावरील देगाव ता.भोर येथे घराच्या गॅलरीतून प्रवेश करीत चोरट्याने २ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना रविवार दि. ९ उघडकीस आली. याबाबत सुभद्रा विठ्ठल यादव वय- ७२ रा. देगाव, ता. भोर यांनी राजगड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली.                       देगाव येथे सुभद्रा यादव यांचे दोन मजली घर असून यादव या सोमवार दि.३ ते रविवार दि. ९ पर्यंत मुलाकडे मुंबईला गेल्या होत्या.घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी वरच्या मजल्यावरील गॅलरीचा दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली.पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शरद धेंडे हे पुढील तपास करीत आहेत.

                                    
To Top