सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभासद शेतकरी आणि व्यवसायिकांना चांगली सेवा देत असल्यामुळे लोकांच्यात विश्वासार्हता निर्माण झाली आहे लोकांचा विश्वास हेच आपले भांडवल असल्याचे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर यांनी व्यक्त केले.
वडगाव निंबाळकर ता. बारामती येथील शाखेचा पन्नासावा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला यावेळी सभासदांशी संवाद साधताना होळकर बोलत होते. बँकेने नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून सभासदांना सेवा दिली माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांना सेवा पुरवली जात आहे. एक ऑगस्ट 2022 पासून बिगर शेती साठी कर्जाचा व्याजदर दहा ते बारा टक्क्यावरून आठ ते दहा टक्क्यांवर करण्यात आला आहे याचा व्यवसायिकांनी लाभ घ्यावा वडगाव निंबाळकर शाखेचा कारभार उत्तम असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. बँकेचे शाखाधिकारी दत्तात्रय कदम यांनी सांगितले की शाखेला पन्नास वर्षे पूर्ण झाले असून परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे बचत खातेदारांची संख्या 1464 असून 74 चालु खातेदार आहेत. सोसायटी ग्रामपंचायत असे सामुदायिक 125 खातेदार आहेत दहा कोटी २० लाख रुपये शेतीसाठी कर्ज पुरवठा केला आहे तर दोन कोटी 80 लाख रुपये बिगर शेती साठी कर्ज पुरवठा केला आहे शेती कर्जाचा 80 टक्के कर्ज वसुली तर बिगर शेतीचे शंभर टक्के खर्च वसुली आहे शाखेत 27 कोटी 87 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. विकास अधिकारी रणजीतसिंह जगताप सुरेश गायकवाड वीरेंद्र जाधव हरीश इधवते गणेश माने यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी बारामती पंचायत समितीचे माजी उपसभापती अविनाश शिंदे उपसरपंच संगीता शहा सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक अनिलकुमार शहा प्रगतशील बागायतदार राजकुमार शहा, काँग्रेस आय बारामती तालुका अध्यक्ष राजेंद्र राजेनिंबाळकर , दिपक शिंदे, अशोक माने, दत्तात्रय गिरमे, निलेश आगम, दत्तात्रेय खोमणे, संजय साळवे, प्रकाश जाधव, मारुती पानसरे, मिलींद बोकील यांच्यासह खातेदार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------